आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:सिन्नरला 31 शाळांमध्ये 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

सिन्नर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणहक्क कायदा २००९ मधील‎ तरतुदींनुसार तालुक्यातील ३१ पात्र‎ शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली‎ आहे. त्यानुसार एकूण २७१ विद्यार्थ्यांना‎ मोफत प्रवेश मिळणार आहे. १७‎ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची‎ अंतिम मुदत असून पालकांनी मुदतीत‎ अर्ज दाखल करण्याचे आवाहन‎ शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात‎ आले आहे.‎ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित‎ घटकांतील पाल्यांना शासनमान्य‎ विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित‎ व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५‎ टक्के प्रवेश हे राखीव ठेवण्यात येतात.‎

प्रवेशप्रक्रिया ही पारदर्शी व प्रभावीपणे‎ राबवता यावी, यासाठी संपुर्ण राज्यात‎ एकाचवेळी ती पार पाडली जाते.‎ पालकांनी शासनाने विहित केलेल्या‎ परिपूर्ण कागदपत्रांसह संबधित शाळेशी‎ तत्काळ किंवा स्वतः शासनाच्या‎ https://student.maha‎ rashtra.gov.in/ या संकेतस्थळावर‎ संपर्क साधावा. प्रवेशप्रक्रिया प्रभावीपणे‎ पार पाडण्यासाठी वेळापत्रक ठरवून‎ दिलेले आहे. पालकांनी या योजनेचा‎ लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षण‎ अधिकारी मंजूषा साळुखे, तालुका‎ समन्वयक सचिन गुरुळे (मोबा.‎ ८३०८०२९१००) यांनी केले आहे.‎

तक्रार निवारण समितीची स्थापना‎
शासनमान्य विनाअनुदानित, कायम‎ विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित‎ शाळांना सदरचे प्रवेश देणे बंधनकारक‎ आहे. प्रवेशस्तर ठरविण्याच्या सूचना‎ शाळांना दिल्या आहेत. ज्या शाळा‎ आरटीईचे प्रवेश देणार नाहीत त्यांना मान्यता‎ काढण्याबाबत नोटिसा बजावण्याच्या सूचना‎ देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेवर‎ नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने‎ तालुका, जिल्हा व शाळास्तरावर समिती‎ गठित केली आहे. पालकांनी तक्रारीसाठी‎ समितीशी संपर्काचे आवाहन केले आहे.‎

तालुक्यातील पात्र शाळा आणि प्रवेश मर्यादा‎
किड्झ अकॅडमी सिन्नर - २५, शताब्दी इंग्लिश स्कूल - ६,‎ पिंकरोज इंग्लिश स्कूल, बारागावपिंप्री - ३, ज्ञानदीप‎ इंग्लिश स्कूल कासारवाडी - ५, श्री साई नारायण स्कूल‎ कोनांबे - ४, एस. जी. पब्लिक स्कूल सिन्नर - १८, एस.‎ के. पब्लिक स्कूल, नायगाव - ६, लक्ष्मणगिरीजी महाराज‎ इंग्लिश स्कूल पांढुर्ली - ५, श्री इंग्लिश स्कूल शिवाजीनगर‎ सिन्नर - ११, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल सरदवाडी - ६,‎ एस. डी. जाधव इंग्लिश स्कूल शहा - ८, नवजीवन डे‎ स्कूल सिन्नर - १६, सिल्व्हर लोट्स इंग्लिश स्कूल सिन्नर‎ - १०, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर - २९,‎ प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी - १७, लक्ष्मणगिरीजी‎ महाराज इंग्लिश स्कूल सोनारी - २, गुरुकृपा मॉन्टेसरी‎ इंग्लिश मीडियम स्कूल ठाणगाव - ०१, इरा किड्झ पब्लिक‎ स्कूल ठाणगाव - ७, इरा इंटरनॅशनल स्कूल सिन्नर - १५,‎ एस. एस. के. पब्लिक स्कूल वडझिरे - ६, आर. पी. गोडगे‎ पाटील पब्लिक स्कूल वावी - ६, आर. पी. गोडगे पाटील‎ मराठी स्कूल वावी - ७, भाऊसाहेब आव्हाड इंग्लिश‎ मीडियम स्कूल दापूर - ३, ब्रेव्हस इंग्लिश मीडियम स्कूल‎ मोहदरी - ३, अभिनव बालविकास मंदिर नायगाव - १४,‎ स्वामी अद्वैतानंद महाराज गुरुकुल सांगवी - १, अभिनव‎ बालविकास मंदिर वडांगळी - १२, स्वामी विवेकानंद‎ प्रायमरी स्कूल विंचूरदळवी - ५, सिन्नर भूषण एस. जी.‎ गडाख स्कूल पंचाळे - ११, यशदा इंग्लिश मीडियम स्कूल‎ माळेगाव - ७, अभिनव बालविकास मंदिर पांढुर्ली - ७.‎

बातम्या आणखी आहेत...