आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:सिन्नरला 12 ग्रामपंचायतींसाठी 440 अर्ज ; आज हाेणार अर्ज छाननी

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह ठाणगाव आणि १२ ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी ग्रामपंचायतींसाठी ७९ तर सदस्यपदासाठी ३६१ असे ४४० इच्छुकांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने नशीब आजबावण्यासाठी इच्छुक सरसावले आहेत. साेमवारी (दि. ५) अर्ज छाननी हाेणार आहे. त्यानंतर माघारीच्या मुदतीनंतर चित्र स्पष्ट हाेणार आहे.

सरपंचपदासाठी ठाणगाव - ७, कीर्तांगळी -६, पाटपिंप्री-२, सायाळे -४, लोणारवाडी- ७, वडगावपिंगळा -८, नांदूरशिंगोटे - ५, कृष्णानगर (डुबेरवाडी) -९, टेंभुरवाडी -६, कारवाडी- ७, शहा-१३ अर्ज दाखल झाले आहेत. सदस्यपदासाठी ठाणगाव -३१, कीर्तांगळी - ३०, पाटपिंपरी -२२, सायाळे -२५, लोणारवाडी -४६, वडगाव पिंगळा -४७, नांदूरशिंगोटे -४५, कृष्णानगर (डुबेरवाडी)- १४, टेंभुरवाडी - १४, कारवाडी -२५, उजनी - २६, शहा - ३६ अर्ज दाखल झाले आहेत. आज सोमवारी ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात छाननी होणार आहेत. त्यानंतर ७ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतमि यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गावोगावी दुरंगी लढती होणार की बहुरंगी याचे चित्रही माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...