आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी सिन्नरला प्रहारचा रविवारी रास्ता रोको

सिन्नर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ओला दुष्काळ‌ जाहीर करावा, विमा कंपनीने त्वरित सर्व्हे करून शेतकऱ्याना रक्कम द्यावी, यासाठी प्रहार पक्षातर्फे रविवारी (दि. २५) सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी दिली. सिन्नर-निफाड मार्गावर बाजार समितीसमोर हे आंदोलन होणार आहे.

पावसामुळे सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेल्याने खराब झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून विमा कंपनीने नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी प्रहारतर्फे करण्यात आली आहे.