आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २०) सकाळी १० वाजता सिन्नर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी चार टेबलवर तीन फेऱ्या होणार असल्याची माहिती तहसीलदार एकनाथ बंगाळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली. रविवारी ग्रामपंचायतींसाठी ८२.८८ टक्के मतदान झाले होते. १२ थेट सरपंचपदासाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. बारा ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी असे १२ कर्मचारी असणार आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणी प्रतिनिधींना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेश दिला जाणार आहे. ओळखपत्राशिवाय उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधींना आत प्रवेश दिला जाणार नसल्याचे नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी सांगितले.
..अशी होणार १२ ग्रामपंचायतींची मतमोजणी पहिल्या फेरीत ठाणगाव, नांदूरशिंगोटे, वडगाव आणि शहा या मोठ्या ग्रामपंचायतींची मोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत शास्त्रीनगर, कृष्णनगर, उजनी आणि पाटपिंप्री तर तिसऱ्या फेरीत सायाळे, आशापूर, कारवाडी, कीर्तांगळी या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजता पहिल्या चार ग्रामपंचातींचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. १२ ग्रामपंचायतीची मतमोजणी दोन तासात आटोपण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.