आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिन्नरला दुचाकी, कार विक्रीचा टाॅप गेअर; दसऱ्याच्या मुहूर्तावर गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. १२० ट्रॅक्टर, २६० दुचाकी तर ४८ चारचाकी वाहनांची दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्री झाली. विजयादशमीला नवीन वस्तू घरी आणण्याचे स्वप्न अनेकांनी पूर्ण केले.शहरातील विविध कंपन्यांच्या दुचाकी शोरूममधून दिवसभरात २६० दुचाकी विक्रीस गेल्या. गतवर्षी २०० दुचाकींची विक्री झाली होती. तुलनेत ६० दुचाकी जास्त विकल्या गेल्या. यंदा मात्र ट्रॅक्टर विक्रीत घट झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी १२५ ट्रॅक्टर विक्री झाले होते. यंदा १२० ची विक्री झाली आहे.

किरकोळ घट असली तरी दिवाळीत उत्साह दिसेल, अशी आशा विक्रेत्यांना आहे. कार खरेदीत मात्र उत्साह दिसून आला. गतवर्षी ३० ग्राहकांनी कार खरेदी केल्या होत्या. यंदा ४५ कार विकल्या गेल्या आहेत. सीएनजी कार खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ही गर्दी केली होती. संगणक, वॉशिंग मशीन, घरघंटी, टीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी राहिली. गतवर्षी इतकीच यंदाही वस्तू खरेदीस प्रतिसाद मिळाला.

मुहूर्तावर सोने, खरेदीला पसंती
सोने, चांदी खरेदीत गुंतवणूक करण्यास अनेकांनी प्राधान्य दिले. सोन्याचे दागिने खरेदी करण्यास महिलांनी उत्साह दाखवला. लाखो रुपयांची उलाढाल सोने खरेदीत झाली. दोन वर्षांपासून सराफ बाजाराला मरगळ होती. ग्राहकांचा प्रतिसाद वाढलेला पाहून व्यापाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

अनेकांचे घर, शाॅपचे स्वप्नही पूर्ण
विजयादशमीच्या पार्श्वभू‌मीवर अनेकांनी अनेकांनी नवीन घराचे शोरूमचे स्वप्नही पूर्ण केले. बांधकाम व्यावसायिकांनी नवीन प्रोजेक्ट सुरू केले. त्यातही दसऱ्याच्या मुहूर्तावर बुकिंग झाल्या. दोन वर्षे उद्योग, व्यवसाय डबघाईला आले होते. त्यानंतर खरेदीला वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...