आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील नांदुरी रस्त्यावरील नववसाहतीत दि.३० रोजी रात्री १० ते ३.३० या दरम्यान पंढरीनाथ नगर मधील रो - हाऊसच्या दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी इतर पाच बंद घरांची कुलुपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला. नववसाहतींमध्ये पथदीप बंद असल्याने येथे अंधार असताे.
नांदूरी रस्त्यावरील पंढरीनाथ नगरमध्ये राहणारे राहुल कैलास काळे हे परिवारासह सायंकाळी ७ वाजता खंडोबाच्या दर्शनासाठी ओझरला गेलेले असताना रात्री त्यांचे रो - हाऊसच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले, वरच्या मजल्यावरील दोन्ही खोल्यांमधील लोखंडी कपाटांचे दरवाजे उघडून ८ लाख रुपये रोकड, सोन्याचे मंगळसूत्र २७ हजार रुपये, सोन्याची बाळी ३ हजार रुपये, सोन्याची चेन ६६ हजार रुपये, सोन्याची पट्टी पोत ४५ हजार रुपये असा एकूण ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या घटनेची खबर राहुल कैलास काळे यांनी अभोणा पोलिसांना दिली.
दरम्यान, इतर पाच ठिकाणी देखील घरांची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला. त्यात कनाशी रस्त्यावरील चंद्रशेखर विष्णू जोशी, नांदूरी रस्त्यावरील मोनाबाई लक्ष्मण पवार, अर्जुन नामदेव पवार, अनिल हरिश्चंद्र पवार, राजेंद्र सुदाम गायकवाड यांचा समावेश आहे. परंतु सुदैवाने येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.या घटनांची माहिती मिळताच अतिरिक्त प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतळे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना तपासकामी सूचना केल्या. सीसीटीव्हीत चित्रित झालेले सहा चाेर दोन स्पोर्ट बाइकवरून लाइट बंद करून फिरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.