आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक मोटारीची चोरी:इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या सहा संशयितांना कोठडी

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या सहा संशयितांना वडनेरभैरव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाच इलेक्ट्रिक मोटारी व दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तालुक्यातील शिवरे येथील शेतकरी संतोष भास्कर वाटपाडे यांच्या शेत गट नं १३ मधील विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटारीची चोरी केली होती. तसेच विहिरीतील एसडी पाइप फोडून इलेक्ट्रिक वायर कट करून चोरून नेली होती. याबरोबरच परिसरातील विहिरींमधून शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींची चोरी झाल्याने वडनेरभैरव पोलिसांनी तपासकामी पथक तयार केले होते.

गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी संशयित नामदेव श्रीपत गांगुर्डे (२२, शिवरे, ता. चांदवड) याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने प्रवीण लक्ष्मण भोये (२७, संगमनेर वणी, ता. दिंडोरी), प्रवीण उत्तम गुंबाडे (२२, मूळ रा. टिटवे, ता. दिंडोरी, हल्ली रा. शिवरे, ता. चांदवड), रंजित ऊर्फ शरद बाळू गांगुर्डे (२२, चिखलआंबे, ता. चांदवड) यांच्यासोबत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली व चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटारी संशयित संजय तुमडू जावरे (३७, रा. इंदिरानगर वणी, ता. दिंडोरी) यांना दिल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी संशयितांना चिखलांबे, शिवरे, संगमनेर, ता. दिंडोरी येथून ताब्यात घेतले व त्यांच्याकडून पाच इलेक्ट्रिक मोटारी व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी संशयित आजम समसुल्ला अन्सारी (३२, मूळ रा. दुधवणीया ता. डेबरवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश ह. रा. म्हसरुळ, ता. जि. नाशिक) यास अटक केली. संशयितांना न्यायालयाने दि. ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस हवालदार एस. जे. उबाळे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...