आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा जाळून प्रदूषण करत असल्याची तक्रार:मालेगावी प्रदूषण वाढविणाऱ्या सायजिंग कारखान्यांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

मालेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक कचरा व रबर जाळून प्रदूषण निर्माण केले जात असल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाच सायजिंग कारखान्यांची पाहणी केली. आयशानगर भागात राहणाऱ्या माेहंमद हस्सान माेहंमद शफी यांनी संबंधित सायजिंगविराेधात तक्रार दाखल केली आहे.प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन शहरातील काही सायजिंग कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत.

मात्र, असे कारखाने बेकायदेशीरपणे चालविले जात आहेत. रात्रीच्या वेळी सायजिंग कारखाने चालवून त्यांच्या बाॅयलरमध्ये जाळण्यासाठी माेठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा व रबरचा वापर हाेत आहे. यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण वाढत आहे. घाण वासामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. परिसरात राहणाऱ्या गरीब नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या रेकाॅर्डनुसार प्रदूषण निर्माण करणारे पाचही कारखाने कायमस्वरुपी बंद केले आहेत. तरीही संबंधितांकडून सायजिंग कारखाने सुरू ठेवून उत्पादन तयार केले जात आहे. तक्रार करणाऱ्यांना कारखानदारांकडून धमकावण्याचे प्रकार हाेत असल्याचा आराेप माेहंमद हस्सान यांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सायजिंगची पाहणी केली आहे. पाहणीवेळी निदर्शनास आलेल्या बाबींवर पुढील कार्यवाही हाेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या सायजिंगचा समावेश
तक्रारीत पाच सायजिंगचा उल्लेख करण्यात आला आहे. यात नजिरा सायजिंग वर्क्स, पाटकिनारा, आर. एच. सायजिंग, देवीचा मळा, चाैधरी सायजिंग, देवीचा मळा, स्मार्ट सायजिंग, हिरापुरा व माेगरा सायजिंग, देवीचा मळा यांचा समावेश आहे.

यापूर्वीही सायजिंगवर कारवाई
राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाच्या आदेशाने २०१९ मध्ये वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या प्लास्टिक गिट्टी व सायजिंग कारखान्यांवर कारवाया झाल्या आहेत. २८ सायजिंग सील करण्यात आले हाेते. यातील दहा सायजिंग न्यायालयाच्या आदेशाअंती सुरू झाले आहेत. या तक्रारीमुळे वायू प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...