आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या सीमेवरून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या व अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघा पिकअप वाहनासह तस्करांसाठी असलेली स्विफ्ट गोसेवकांमुळे पकडण्यात यश आले आहे. यामध्ये १३ जनावरांची सुटका करण्यात आली. सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे साल्हेर परिसरातील घुलमाल व ततानीजवळ तस्करांना गोसेवक आल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मार्ग बदलत डांगसौंदाणे भागातून वाहने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी केलेली मदत आणि परिसरातून गोसेवकांची झालेली मदत यामुळे दोन पिकअप वाहने व तस्करांसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट पकडण्यात आली. तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. तर एकाला पकडण्यात गोसेवकांना यश आले. पहाटे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत दोन पिकअप वाहनासह १३ जनावरे व एक स्विफ्ट असा मुद्देमाल जप्त केला आहे. अश्फाक अहमद निसार अहमद (३८, रा. मालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तस्करांची टोळी कार्यरत साल्हेरपासून गुजरातमध्ये जाण्यासाठी असलेल्या मार्गाचा तस्करी केलेले जनावरे वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. वाहनाचा पाठलाग गोसेवकांना करावा लागतो. यामध्ये हे तस्कर या वाहनधारकांवर मिरची पूड किंवा अन्य विषारी पावडर फेकण्याचा प्रकारही करतात. आजच्या घटनेतील स्विफ्ट गाडीतून अशीच काही पावडर फेकण्यात येत होती. महाराष्ट-गुजरात सीमेवर काही भागात गस्त वाढविण्याची मागणी गोसेवकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.