आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:एस.एन.डी. अभियांत्रिकीच्या १२९ विद्यार्थ्यांची ‘कॅम्पस’द्वारा निवड; पुणे येथील टॅलेंट सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इंटर्नशिप

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्रातील १२९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यांनी दिली.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे स्किलसेट्स विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये इंटर्नशिपसाठी कॅम्पस प्लेसमेंटच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. या ड्राइव्हमध्ये टॅलेंट सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड, पुणे ही नामांकित कंपनी सहभागी झाली होती. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, आय. टी. व सिव्हिल अभियांत्रिकीच्या १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कंपनीने अॅप्टिट्यूड टेस्ट घेतली. यामध्ये १६० पैकी १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत १० हजार ते ३० हजारापर्यंतचा आकर्षक स्टायपेंड देण्यात येईल, असे प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील व प्लेसमेंट अधिकारी प्रा. अमित सोलंकी व प्रा. हर्षवर्धन घोंगडे यांनी सांगितले. तसेच जे विद्यार्थी इंटर्नशिपच्या पीरियडमध्ये एक्सलंट परफॉर्म करतील त्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर १२ लाखांच्या पॅकेजवर कंपनीत कायमस्वरूपी नोकरीसाठी रुजू करण्यात येईल, असे कंपनीचे एच. आर. मॅनेजर मिस मेघना वोराह यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, सरचिटणीस कुणाल दराडे, संचालक रूपेश दराडे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...