आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेला गरजेची असलेली अद्ययावत साउंड सिस्टिम डुबेरे विद्यालयास भेट देण्यात आली. दहावीच्या १९९१-९२ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत ही मदत दिली. प्राचार्य किशोर जाधव यांनी मदतीचा स्वीकार केला. अर्जुन वाजे, मोहन माळी, डॉ. दिलीप पावसे, अशोक वामने, तुकाराम कुंदे, संदीप वणवे, कृष्णा कराड, भास्कर सांगळे, मीनानाथ खताळे, अरुण वामने, संजय नन्नावरे आदी उपस्थित होते. शाळेला साउंड सिस्टिमची गरज असल्याचे मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी व्हाॅट्सअॅप ग्रुपवर यासाठी चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानातून मदत करण्यात आली. शाळेसाठी बहुतेक सुविधा उपलब्ध करून देऊन येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रेरक वातावरण निर्माण करण्यासाठी माजी विद्यार्थी पुढील काळातही मदतीसाठी तत्पर राहू, असे मत माजी सरपंच अर्जुन वाजे यांनी व्यक्त केले. शाळा व शिक्षकांचे ऋण मोठे असून या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थ्यांनी पुढील पिढ्यांसाठी आदर्श घालून दिला असल्याचे मत प्राचार्य जाधव यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी साउंड सिस्टिमची गरज होती. ती पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. मदतीबद्दल माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी. आर. करपे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ गिरी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.