आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली येथील प्रगती मैदानावर ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अमृतपेक्स-२०२३ या राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनाच्या (फिलाटेली) औचित्याने नाशिक विभागात सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम भारतीय डाक नाशिक विभागाच्या वतीने हाती घेतली आहे. येत्या ९ आणि १० फेब्रुवारी रोजी या विशेष मोहीमेतंर्गत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिराव यांनी दिली.
देशात महिला सबलीकरण व सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल आहे. शहरासह ग्रामीण भागातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहाेचाव्यात हा या मोहिमेचा उद्देश आहे. प्रत्येक सब पोस्ट ऑफिस व ग्रामीण भागातील शाखा डाकघर यासाठी तयारीला लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसने सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची जय्यत तयारी केली आहे. पालकाने १० वर्षाच्या आतील मुलीसाठी या योजनेचा लाभ घेऊन जवळच्या पोस्ट कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे आवाहन नाशिकचे वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव, पश्चिम विभागाचे सहाय्यक अधीक्षक विशाल निकम यांनी केले आहे.
२५० रुपयांत खाते... सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ १० वर्षाच्या आतील वयोगटाच्या मुलींसाठी घेता येईल. सुरुवातीला फक्त २५० रुपये भरून खाते सुरू करता येऊ शकते. या योजनेंतर्गत ७.६ टक्के असा व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत दिला जात आहे. दरवर्षी आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये या खात्यावर जमा करता येऊ शकतात.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.