आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी-सिन्नर फाटा येथील महामार्ग सुप्रीम कोर्ट कमिटीने ‘ब्लॅकस्पॉट’ घोषित केला आहे. या परिसरात तातडीने जंक्शन उड्डाणपूल करण्यात यावा, अशी मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून कामकाज सुरू आहे. या संथगतीच्या कामांमुळे घोटी टोलनाका ते खंबाळेपर्यंत नेहमीच पाच ते सहा किलोमीटरची वाहनांची रांगा लागते.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मुंढेगाव-खंबाळे शिवारात झालेल्या अपघातामध्ये आत्तापर्यंत पाच-सहा जणांचा बळी गेला होता. या जंक्शन उड्डाणपुलाचे कामकाज धिम्या गतीने सुरू असल्यामुळे हा अपघात झाले असून अद्यापपर्यंत या जंक्शन पुलाचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून घोटी टोलनाका ते खंबाळे फाट्यापर्यंत महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असूनही संबंधित विभाग मात्र डोळेझाक करत आहे. वाहनचालक व प्रवासी वारंवार तक्रार करत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस इगतपुरी दौऱ्यावर असल्याने या महामार्गाची थातूरमातूर डागडुजी करून रंगरंगोटी करण्याचे सौजन्य राष्ट्रीय प्राधिकरण विभाग दाखवत आहे. तसेच टोलनाका प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत आहे. तर सिन्नर फाट्यावर आजही अक्षरश: धुळीचे लोट वाढत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचेही या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे.
काम जलदगतीने करा अन्यथा आंदोलन : घोटी-सिन्नर चौफुलीवरील जंक्शन पुलाचे काम दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून अपघाताचे प्रमाण व वाहतुकीची समस्या वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे काम न केल्यास युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करू.- अनिल पढेर, उपजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.