आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदकाचा प्रथम पुरस्कार‎:महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा; प्रशस्तिपत्र देऊन गौरव‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय महसूल क्रीडा व‎ सांस्कृतिक स्पर्धा वाशीम येथील‎ जिल्हा क्रीडा क्रीडा संकुलावर पार‎ पडल्या असून या स्पर्धेमध्ये‎ खामगावचे नायब तहसीलदार‎ विजय पाटील, हेमंत पाटील यांना‎ उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रथम‎ पुरस्कार मिळाला आहे. प्रशस्तिपत्र‎ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.‎ विभागीय महसूल क्रीडा व‎ सांस्कृतिक स्पर्धा २०२२-२३ या‎ वाशीम येथे ३१ डिसेंबर व १, २‎ जानेवारी रोजी पार पडल्या. या‎ कार्यक्रमाचा समारोप २ जानेवारी‎ रोजी विभागीय आयुक्त डॉ.दिलीप‎ पांढरपट्टे यांच्या उपस्थित पार‎ पडला.‎

तीन दिवशीय चाललेल्या‎ विभागीय महसूल क्रीडा व‎ सांस्कृतिक स्पर्धेत खामगाव येथील‎ नायब तहसीलदार विजय पाटील व‎ नायब तहसीलदार हेमंत पाटील या‎ दोघांनी निवेदक या प्रकारात‎ विभागातून प्रथम क्रमांक‎ पटकावला आहे. त्यांना प्रशस्तिपत्र‎ देऊन गौरविण्यात आले आहे. तर‎ विजय पाटील यांनी लॉन टेनिस या‎ खेळात दुहेरी मध्ये मेहकरचे‎ तहसीलदार डॉ.संजय गरकल‎ यांच्यासोबत तसेच जिल्हाधिकारी‎ कार्यालय बुलडाणा येथील अव्वल‎ कारकून प्रतिभा भोंडोकार‎ यांच्यासोबत टेबल टेनिस मिक्स‎ डबल मध्ये यश संपादन केले आहे.‎ सदर यश हे जिल्हाधिकारी‎ एच.पी.तुम्मोड तसेच निवासी‎ उपजिल्हाधिकारी दिनेश गीते,‎ प्रभारी उपविभागीय अधिकारी‎ अतुल पाटोळे यांच्या‎ मार्गर्शनाखाली मिळविले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...