आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:स्टाईस ची निवडणूक जाहीर, 17 जुलैला मतदान; औद्योगिक सहकारी वसाहत

सिन्नर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत तथा स्टाईसच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १५ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून १७ जुलै रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे उपनिबंधक अधिन सहनिबंधक किरण गायकवाड काम पाहणार आहेत. नामनिर्देशनपत्रे निवडणूक कार्यालयात ९ जून ते १५ जूनदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रांच्या यादीचे प्रकाशन हे जसजसे प्राप्त होतील त्याप्रमाणे रोज संध्याकाळी ४ वाजता होईल. १६ जून रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

वैध नामनिर्देशनपत्रांची सूची १७ जूनला निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. १७ जून ते १ जुलै सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. ४ जुलै रोजी उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन होणार आहे. १७ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी घोषीत करतील. मतमोजणी १७ जुलै रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने होईल.

बातम्या आणखी आहेत...