आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओहोळ नाल्यावरील नवीन पुल:पुलावरील रखडलेले रस्ताकाम सुरू

अभोणा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभोणा-कळवण रस्त्यावरील शास्त्रीनगर भागातील ओहोळ नाल्यावरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु या पुलावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरणाचे काम न झाल्याने मोठमोठे खड्डे पडले होते. त्यातच खडीचे ढीग आणून पडले होते. रहदारीस होणाऱ्या या अडथळ्यामुळे वाहतूक कोंडी हाेत असे, अपघातांचे प्रमाणदेखील वाढले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. याबाबत दै.‘दिव्य मराठी’त दि. १८ रोजी वृत्त प्रसिद्ध हाेताच संबंधितांनी दखल घेऊन रस्ताकामास गती दिल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

या रस्त्यावरील शास्त्रीनगर भागातील ओहोळ नाल्यावरील जुन्या पुलाच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करण्याची मागणी दै. ‘दिव्य मराठी'ने केली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन कोटी रुपयांतून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या पुलावरील खडीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरणाचे काम रखडल्याने हा रस्ता धोकेदायक बनला होता. त्यातच ठिकठिकाणी खडीचे ढीग टाकून ठेवल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. या रहदारीच्या मुख्य रस्त्यात दिवसभर वाहतुकीच्या कोंडीमुळे छोट्या-मोठ्या अपघातांचा मुद्दा गंभीर बनला होता. या विषयाचे सचित्र वृत्त दि. १८ राेजी प्रसिद्ध हाेताच दखल घेऊन संबंधितांनी रस्ते कामाचा मुहूर्त साधला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...