आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणास तातडीने प्रारंभ करा

लासलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे. नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देतानाच कुठल्याही परिस्थितीत योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या अशी सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली.

लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठा योजना आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. भुजबळ यांनी पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील व पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत योजनेच्या कामाबाबत चर्चा केली. यावेळी योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश देण्यात येईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

यावेळी समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता आव्हाड, बांधकाम विभागाचे उपअभियंता गोसावी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, योजनेची पाइपलाइन जुनी झाल्याने जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटिंग योजनेंतर्गत योजनेसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, दरडोई खर्च आणि साहित्याचे दर वाढल्यामुळे खर्चात अधिक वाढ होत असल्याने योजनेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निविदाप्रक्रिया झाली. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने कार्यारंभ आदेशाला विलंब झाला. आता आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन कामास सुरुवात होईल.

आठ दिवसांत खड्डे बुजवा
लासलगाव-विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याला विलंब होत असल्याने लासलगाव विंचूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात यावे. तसेच रस्त्याला अडथळा निर्माण होत असलेल्या वृक्षांची छाटणी करून अडथळा दूर करावा. तसेच रस्त्यावरील खड्डेही तातडीने बुजविण्याचे काम करावे अशा सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

बातम्या आणखी आहेत...