आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:मनमाडला नव्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती मागविण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ; मंगळवार (दि. 10) पासून ही प्रक्रिया सुरू झाली आ

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपालिकेतही १० ते १४ मेदरम्यान जाहीर प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार असून मंगळवार (दि. १०) पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

सर्वोच्च न्यालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगातर्फे नगरपालिका निवडणुकीची यापूर्वी सुरू होऊन स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपालिकेने सादर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर १० ते १४ मेदरम्यान हरकती आणि सूचना दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांवर सोमवार दि. २३ मे पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील.

३० मेपर्यंत हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन तसा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठविला जाईल तर ७ जून रोजी अंतिम प्रभागरचनेला मंजूरी देण्यात येईल असा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...