आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्धी कार्यक्रम:राज्य निवडणूक आयोगाने मनमाड; मनमाडला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम लांबणीवर

मनमाड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाने मनमाड पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० जूनला मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरून त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी मंगळवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्यात येणार होती. परंतु संगणकीय अडचणीमुळे याद्या डाऊनलोड होण्यास उशीर झाल्याने मनमाड पालिकेसाठीची यादी मंगळवारी प्रसिद्ध होवू शकली नसून ती बुधवारी (दि. २२) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी तसेच आजी-माजी नगरसेवकांनी पालिकेत यादी पाहण्यासाठी धाव घेतली, परंतु सायंकाळपर्यंत याबाबत काम पूर्ण झालेले नव्हते. एक-दोन दिवसांत ते पूर्ण होईल असे त्यांना सांगण्यात आले. पालिकेच्या अंतर्गत सर्व बीएलओसह वसुली विभागाच्या २० कर्मचाऱ्यांची टीम गेल्या तीन दिवसांपासून त्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. परंतु, कंट्रोल चार्ट मंगळवारी सायंकाळपर्यंत तयार होऊ शकला नाही. प्रभागनिहाय मतदार याद्या डाऊनलोड होण्यास उशीर लागत असल्याने वेळेवर याद्या प्रसिद्ध होवू शकल्या नसल्याचे समजते.

त्यानंतरच प्रभागवार एकूण १६ प्रभागांची पीडीएफ फाईल तयार होईल. विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, वगळणे, दुरुस्ती व पत्त्यामधील दुरुस्ती याबाबतची कार्यवाही, हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय व मतदार केंद्रनिहाय या सर्व सूचनांचा विचार करून अंतिम यादी १ जुलै रोजी तयार होईल. या याद्या डाऊनलोड झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एका बूथवर ७५० मतदार याप्रमाणे अंदाजे एकूण १०० बूथसंख्या व त्यांची ठिकाणे जाहीर होतील. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी २१ ते २७ जूनपर्यंत आहे. अंतिम याद्या अधिप्राणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख १ जुलै आहे. मतदान केंद्रांची केंद्रनिहाय मतदार यादी ५ जुलैला पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...