आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसमादे परिसर विकास मंडळसंचालित विठेवाडी येथील डॉ. डी.एस. आहेर इंग्लिश मीडियमपब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मल्टिफंक्शनल रोबोटिक कारबनवून जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या उपकरणाचा उपयोग कोणत्याही पिकाला स्वयंचलित पद्धतीने खते देण्यासाठी व कुठेही लागलेली आग विझवण्यासाठी होऊ शकतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
ज्या ठिकाणी जास्त मनुष्यबळ लागणार आहे, तिथेही आपण ही कार वापरू शकतो. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. या प्रदर्शनात प्रा. हर्षल भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सेजल पाठक आणि अविनाश परदेशी या विद्यार्थ्यांनी यासाठी अपार मेहनत घेतली. यासाठी प्राचार्य बी. के. पाटील आणि उपप्राचार्य शुभांगी सावंत यांचे सहकार्य लाभले.
मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांना पालकांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्छाव आणि प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.