आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ खेळाडूंची राज्यपातळीवर निवड‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील मीनाताई ठाकरे‎ स्टेडियम येथे गुरुवारी घेण्यात‎ आलेल्या नाशिक विभागीय‎ पातळीवरील युनिफाइट स्पर्धेत‎ येथील श्रीमान पी. डी. सुराणा कला,‎ वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ‎ महाविद्यालयातील खेळाडूंनी‎ चमकदार कामगिरी करत सुयश‎ प्राप्त केले. या खेळाडूंची‎ राज्यपातळीवर स्पर्धेसाठी निवड‎ झाली आहे.‎ विभागीय पातळीवरील स्पर्धेत‎ सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील‎ दिशा भालेकर (अकरावी विज्ञान),‎ स्नेहल गांगुर्डे (बारावी वाणिज्य),‎ विद्या सोनवणे (अकरावी‎ वाणिज्य), शिवानी शिंदे (बारावी‎ वाणिज्य), सोहम गोयल (बारावी‎ विज्ञान) या खेळाडूंनी विविध वजन‎ गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

‎ त्यांची सातारा येथे होणाऱ्या राज्य‎ पातळीवरील स्पर्धेसाठी निवड‎ झाली. या यशाबद्दल सर्व यशस्वी‎ खेळाडूंचे संस्थेच्या विश्वस्त‎ समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती,‎ प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित‎ सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक‎ कांतीलाल बाफना, सीए महावीर‎ पारख, प्रशासकीय अधिकारी पी.‎ पी. गाळणकर, प्राचार्य डॉ. जी. एच.‎ जैन यांनी अभिनंदन केले. या‎ खेळाडूंना प्रा. डॉ. डी. एन. शिंपी,‎ प्रा. उत्तम जाधव, प्रा. अजय नायर‎ यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...