आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अखिल भारतीय मराठा महासंघाचे पालिका आयुक्तांना निवेदन; छत्रपती शिवस्मारकाचे मंजूर काम सुरू करा

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवस्मारक सुशोभीकरणाचे काम मंजूर असून गेल्या १९ फेब्रुवारी रोजी नारळ वाढवून कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत शिवस्मारकाच्या सुशोभीकरण कामाची सुरुवात न झाल्यास पालिकेचे गेट बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त सतीश दिघे यांना निवेदन दिले. छत्रपती शिवस्मारक येथील चबुतऱ्याला अनेक ठिकाणी तडे पडले आहेत. परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, त्या ठिकाणी असलेल्या वीजखांबांवरील तारा अंडरग्राउंड करण्यात याव्या. विजेचे खांब काढण्यात यावेत.

गेल्या १९ फेब्रुवारी रोजी स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात येऊन अाता चार महिने उलटूनही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे तत्काळ काम सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी सुभाष गायकवाड, भरत पाटील, हरिदादा निकम, दिलीप पाटील, किशोर जाधव, बापू पाटील, बापू भामरे, राकेश पाटील, दीपक पवार, हरिष मारू, किशोर चौधरी, गणेश गायकवाड, सुभाष जाधव आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...