आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्टिमेटम:मनमानी कारभार थांबवा, आमदारांचा वीज कंपनी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी वीज कंपनीचे कार्यालय शहराच्या मध्य मतदारसंघात सुरु करा, मेंटनन्सवर खर्च केलेल्या २० काेटींचा हिशाेब द्या, विभागनिहाय कस्टमर केअर सेंटर कार्यान्वित करा. मनमानी कारभाराला आवर घाला. जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला तर त्यांना थांबविणे कठीण हाेईल, असा इशारा आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांनी खासगी वीज कंपनी अधिकाऱ्यांना दिला.

शहरात विजेच्या समस्या बिकट झाल्याने शनिवारी दुपारी पाेलिस नियंत्रण कक्षात महावितरण, खासगी वीज कंपनी, यंत्रमाग संघटना व पाेलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आमदार मुफ्ती यांनी कंपनी अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. यंत्रमाग उद्याेजकांनी अधिकाऱ्यांसमाेर अडचणी मांडल्या. फाॅल्टीच्या नावाखाली जूने मीटर बदलून नवीन बसविले जात आहेत. गरज नसताना मीटर बदलण्याचे कारण काय, वीज गळतीच्या नावाखाली अॅव्हरेज बिले ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा आराेप साजिद अन्सारी यांनी केला. करारात काेलकत्ता पाॅवर सप्लाय कंपनीने मेंटनेन्सवर वर्षाकाठी २० काेटी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, विजेच्या समस्या पहाता हा खर्च हाेतच नसल्याचे दिसते. शहरात १९७२ पासून कार्यरत असलेल्या जून्या यंत्रणेचा वापर हाेत आहे.

ट्रान्सफार्मर ओव्हरलाेड असल्याने दरराेज ३ ते ४ तासांचे भारनियमन केले जात आहे. कंपनी ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे युसूफ इलियास यांनी निदर्शनास आणून दिले. कंपनीचा मेंटनन्सवर कुठलाही खर्च नाही. जून्या साहित्यांवर काम चालविले जात आहे. याचा परिणाम वीज गळतीवर हाेत आहे. मात्र, वीज गळती चाेरीच्या नावे ग्राहकांना जबाबदार धरले जाते. ही मनमानी बंद करा, असे उमैर अन्सारी यांनी सांगितले.

बैठकीस आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल, अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती, पाेलिस उपअधीक्षक तेगबिरसिंह संधू, युसूफ इलियास, साजिद अन्सारी, युसूफ नॅशनलवाले, इकबाल बाले मुकादम, उमैर अन्सारी, सुफियान अन्सारी, समीउल्ला अन्सारी, शकील इन्कलाबी आदी उपस्थित हाेते.

१५ दिवसांत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन १५ दिवसांत सर्व समस्या मार्गी लावून कामात सुधारणा करण्याचे आश्वासन देत या वर्षात मेंटनेन्सवर १३ काेटी रुपये खर्च झाले आहेत. या खर्चाचा संपूर्ण हिशाेब दिला जाईल. नवीन वीज जाेडणीची कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करु. अतिरक्त भारामुळे फिडर फेल हाेण्याची भीती असते. त्यामुळे भारनियमन करावे लागते. बैठकीत मांडलेल्या अडचणी साेडविण्याचे शंभर टक्के प्रयत्न हाेतील. झालेले काम व न हाेणारी कामे यासंदर्भात लेखी स्वरुपात माहिती दिली जाईल, असे खासगी कंपनीचे व्यवस्थापक प्रेमसिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...