आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:शेतकऱ्यांची वीजतोडणी थांबवा, अन्यथा आंदाेलन

येवला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत वीजबिलांमुळे महावितरणने रोहित्रच बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे. महावितरणने ही मोहीम त्वरित थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने तहसिलदार व महावितरणच्या उपकार्यकरी अभियंता यांना निवेदनद्वारे दिला आहे.

शेतकऱ्यांनी खरीप पिके उभी केली. खते, बियाणे, डिझेल, मजुरांचे वाढलेले दर यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. रब्बी पिके उभी करण्यासाठी उधार, उसनवार करून कसेबसे रब्बी पीक उभे करत असतानाच सरकारने सुलतानी फर्मान काढून वीजबिल थकबाकीसाठी गावोगाव रोहित्र बंद करण्याचा धडाका लावला. ही मोहीम थांबवून बंद केलेले रोहित्र चालू करून द्यावे, अन्यथा शेतकरी संघटना महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. निवासी नायब तहसीलदार पंकज मगर व महावितरण कंपनी कार्यालयात उपकार्यकारी अभियंता एम. डी. जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे सुभाष सोनवणे, अरुण जाधव, शिवाजी वाघ, जाफरभाई पठाण, परशराम सोनवणे, सुरेश जेजूरकर, दत्तात्रय गायकवाड, रावसाहेब गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, समद शेख, जालिंदर गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...