आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची धावपळ:स्थानिक वाहनधारकांना टाेलमाफीसाठी नागझरी येथे पाच तास रास्ता रोको

बाेरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक वाहनधारकांना घागबारी येथे टोल माफी करावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाशिक-सुरत महामार्गावर बोरगावजवळील नागझरी फाटा येथे पाच तास रास्ता रोको केले.

स्थानिक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो, जीपने नेहमीच टोलनाक्यावरून भाजीपाला, दूध, स्टाॅबेरी, कांद्याची वाहतूक करतात. मात्र, या वाहनांकडून टाेल आकारण्यात येत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागताे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. राज्यात सगळीकडे स्थानिकांना टाेलमाफी देण्यात येते. मात्र, नागझरी येथे स्थानिकांकडून टाेल आकारला जाताे.

याविराेधात नागझरी येथे ३०० ते ३५० कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. वाहने चार ते पाच तास रोखून धरण्यात आली हाेती. गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. नाशिकवरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ झाली. रास्ता राेकाे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन गागुर्डे, उपतालुकाप्रमुख कृष्णा चौधरी, नगराध्यक्ष भरत वाघमारे, सुरेश पिठे, भगवान गायकवाड, सुरेश गाडवे, गणपत भोये, श्रीराम गायकवाड, भास्कर हाडस, पोपट पवार, लक्ष्मण गायकवाड, वसंत बागुल, हरिराम पवार, सागर चौधरी, राजू पिठे, सराडचे सरपंच नामदेव भोये, भाजप नगरसेवक विजय कानडे उपस्थित होते.

असा आकारला जाताे टाेल
महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्याकडून आदानी ग्रुप या कंपनीकडे हा वजनकाटा करारानुसार ताब्यात आहे. चारचाकी वाहन (पिकअप) १ ते ७५०० किलो पासिंगसाठी ४७ रुपये शुल्क आकारली जाते. मीडियम वाहन (आयशर, सहा चाकी वाहन व टेम्पो) यांच्यासाठी ९४ रुपये शुल्क आकारले जाते. हेवी (मोठे ट्रक) १२९९० किलो पासिंगच्या पुढील अवजड वाहनांसाठी १८० रुपये शुल्क आकारले जाते.

बातम्या आणखी आहेत...