आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:महाराष्ट्राच्या प्रगतीत एस.टी.चे योगदान; सिन्नर आगारातील कार्यक्रमात पुंजाभाऊ सांगळे यांचे प्रतिपादन

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र घडविण्यात व प्रगतीत एस.टी.चा बहुमोल वाटा आहे. रस्ता तिथे एस.टी. ही डोळ्यासमोर झालेली प्रगती अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांनी केले. सिन्नर बस आगारात अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता शेळके, आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, स्थानक प्रमुख सुरेश दराडे, ग्राहक पंचायतीचे श्यामसुंदर झळके, भास्कर चतुर, राजेंद्र झगडे, अनिल बोरसे, सुभाष जाजू, सौरभ रत्नपारखी, उदय सानप, विभागातील प्रथम वाहक एकनाथ लोंढे, घनश्याम देशमुख, पुंडलिक मुंढे, हिराशेठ कोकाटे, एम. एम. गिते, एम. एम. नवले, जी. के. ढोबळे, कमलाकर आव्हाड, विश्वनाथ सोनवणे, गवळी, एन. एफ. भारस्कर, बाबाजी शिंदे, रमेश इघेवाड, राजेंद्र इघेवाड, भगवान सानप, एन. के. पालवे, डी व्ही पाचोरे, बी. एम. माळी, उद्धव कोथमिरे, विनायक पवार, राजेंद्र घुले, श्रीमान गावंड, आर. के. वाजे आदी उपस्थित होते.

उद्योजक सांगळे म्हणाले की, एस.टी.त १९६५ मध्ये वाहक म्हणून काम करण्याचा योग आला. तेव्हापासून गावोगावी जाणारी एस.टी. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. सिन्नर आगार साध्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झाले. अवघे एक छोटेसे बाकडे बसण्यासाठी होते. आज एस.टी.ने केलेली प्रगती डोळ्यासमोर असून आजी-माजी सर्वच कामगार, अधिकाऱ्यांच्या श्रमातून एस.टी.ने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे मत सांगळे यांनी व्यक्त केले.

यावेळी एस.टी. व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे भारुड सादर करण्यात आले. सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे गणेश साठे, अर्जुन केंद्रे, पूनम निवाले, सुभाष भोसले, पांडुरंग गवळी यांचा भारुड पथकात समावेश होता. सचिन सांगळे, विलास केदार, दया बैरागी, आनंद गरकल, नयना भालेराव, सुनीता सानप, रुख्मिनी चौरे, स्वाती इलवे, हर्षदा विठोजी आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मनोज गोजरे, शरद नरोडे, विशाल पगार, नितीन वसमते, उमेश आव्हाड, संदीप बलक, लोकेश चांगले यांनी परिश्रम घेतले. देवा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...