आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसएनडी पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. विविध प्रकारचे संघ नृत्य,वैयक्तिक नृत्य, एकपात्री नाटक,महिला अत्याचारविषयी व कोरोनाविषयी जनजागृती करत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.
जगदंबा शिक्षण संस्था संचालित बाभूळगाव येथील एस. एन. डी. पॉलिटेक्निकचे युवास्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन येथील महात्मा फुले नाट्यगृहात पार पडले. यावेळी संस्थेचे संचालक रुपेश दराडे, पॅनासिया हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. कविता दराडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य उत्तम जाधव आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयात यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विधार्थ्यांचे संचालक रुपेश दराडे, डॉ. कविता दराडे आदींच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागात पॉलिटेक्निक सुरू केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता तंत्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे उद्योजक व्हावे हाच आमचा हेतू होता. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रशिक्षण घेऊन उद्योजक बनत आहे.
तसेच अनेक नामांकित कंपन्यात मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवत आहे, हे संस्थेचे मोठे यश असल्याचे संचालक रुपेश दराडे यांनी सांगितले. डॉ. कविता दराडे यांनी विद्यार्थ्यांनी करियरची दिशा निश्चित करून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पुरेपूर आनंद लुटत आपल्यातील कलागुण सादर केले. कार्यक्रमाला विभागप्रमुख सतीश राजनकर, ज्ञानेश्वर धनवटे, गणेश चव्हाण, संतोष खंदारे, शोराब शेख, समन्वयक रविकुमार ताकसांडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.