आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकआणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेत विविध प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला लागवडकेली आहे. विशेष म्हणजे याभाजीपाल्याचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जातो.शुद्ध आणि गावरान भाजीपालाअसल्याने विद्यार्थ्यांना आरोग्यदायीआहे. यात कोणत्याही रासायनिकखतांचा वापर आणि औषध फवारणीकेली जात नाही. सेंद्रिय भाजीपालालागवड व सेंद्रिय खतांचा वापर केलाआहे, असे मुख्याध्यापक एस. डी.धोंडगे व उपशिक्षक समाधान सोनवणेयांनी सांगितले. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. महिला शिक्षकांचेही यासाठी विद्यार्थ्यांनामार्गदर्शन लाभले आहे.
बाजारातील हायब्रीड भाजीपाला न आणता परसबागेतीलच ताजाभाजीपाला दररोज पोषण आहारातवापरला जात आहे. यामुळेच आरोग्यउत्तम राहाते, असे शाळेचे शिक्षकसांगतात. ही हिरवीगार भाजीपालापरसबाग पाहण्यासाठीगटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव,शिक्षण विस्तार अधिकारी नंदुकुमार देवरे, मेशी केंद्रप्रमुख वैशाली पाटील यांनी शाळेस भेट देऊन पाहणी करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.
सरपंच पौर्णिमा सावंत, उपसरपंचरत्नाबाई सावंत व शाळा व्यवस्थापनसमितीचे अध्यक्ष महेश सावंत आणिग्रामस्थ यांनीही या उपक्रमाचे कौतुककेले. सर्व प्रकारची मदत करण्याचेआश्वासित केले. शाळेत नेहमीच वर्षभरविविध प्रकारचे उपक्रम राबविले जातातयामुळेच तालुक्याचे अखेरच्या टोकाचेगाव असूनही विद्यार्थी संख्या आणिउपस्थिती चांगली आहे, असेमुख्याध्यापक धोंडगे यांनी सांगितले.
दोन गुंठे क्षेत्रात वांगी , मेथी, पालक, वाल, आळूची पाने, कोथिंबिर, गिलके, दोडके, भोपळा
परसबागेतील दोन गुंठे क्षेत्रात वांगी , मेथी, पालक, वाल, आळूची पाने, कोथिंबिर, गिलके, दोडके, भोपळा आदींसह वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला लागवड केली आहे. जमिनीची योग्य ती मशागत आणि पाण्याचे योग्य नियोजन करून परसबाग फुलविली आहे.पाणी देणे, गवत खुरपणी, सेंद्रिय खतांची मात्रा देणे आदींसह मशागतीची कामे विद्यार्थीच नित्यनियमाने करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.