आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमजीवी संघटना आक्रमक:दरेवाडी शाळेतील विद्यार्थी आज पंचायत समितीत भरवणार शाळा

इगतपुरी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचा निर्णय झाला आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने बुधवारी शाळा बंद करण्याबाबत पत्र दिल्याने शाळेची घंटा वाजली नाही. यामुळे पहिली ते चौथीचे विद्यार्थी विचलित झाल्याचे दिसले. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून श्रमजीवी संघटनेकडून शुक्रवारी (दि.५) इगतपुरी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवण्याचे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.

शाळेतील मुलांनीच गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून सर्व मुले आपली दप्तरे घेऊन पायी चालत पंचायत समितीमध्ये शाळेसाठी येणार आहेत.दरेवाडी ही आदिवासी वाडी भाम धरणासाठी संपादित झाल्याने तेथील ४० कुटुंबांचे स्थलांतर एका ठिकाणी करण्याचे निश्चित झाले. मात्र आम्ही त्या जागेत जाणार नाही, अन्य जागा आम्हाला द्या, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतली. यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सोयीस्कर जागेत स्थलांतर केले. मधल्या काळात गावकऱ्यांना तात्पुरती मिळालेली जागा आवडल्याने त्यांनी याच जागेत स्थलांतर करण्याचे निश्चित केले.

यावेळी हा वाद सुरु असल्याने नव्या ठिकाणी स्थलांतर होईपर्यंत शाळा दोन्ही ठिकाणी भरवावी असा निर्णय घेतला होता. आता त्याबाबतीत असलेला वाद संपल्याने शाळा व्यवस्थित सुरु असतांना गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा बंद करण्याचा आदेश बजावला. परिणामी येथील आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आता शाळा कुठे शिकायची? अस प्रश्न उपस्थित झाल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.

शुक्रवारी (दि.५) इगतपुरी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ह्या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचे अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गाव कमिटी प्रमुख गणपत भाऊ गावंडा, उपप्रमुख विमलताई कमळू गावंडा, रमेश गंगाराम गावंडा, सितारामभाऊ गावंडा, बाळू देवराम गांगड, साईनाथ यशवंत गावंडा, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ निवृत्ती गावंडा यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...