आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची:आर्जव सुरगाणा पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या साहेब; शाळेला इमारत बांधून द्या

बोरगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोंघाणे ग्रामपंचायतीतील सांबरखल गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने तिच्या दुरुस्तीसाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे साहेब, शाळेला इमारत बांधून द्या ना, असे आर्जव केले. सांबरखल गावात २०२१ मध्ये झालेल्या वादळी पावसाने जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. इमारत दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुरगाणा पंचायत समितीकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र, एक वर्ष होऊनही काहीही कार्यवाही झालेली नाही.

पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून वर्गात बसावे लागणार आहे. शाळेला चांगली इमारत नाही म्हणून विद्यार्थी मंदिर किंवा झाडाखाली बसून शिक्षण घेत होते. श्रमजीवी संघटनेने सोमवारी (दि. २०) सुरगाणा पंचायत समितीसमोर आंदोलन केले. यावेळी सर्व विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते. गटशिक्षणाधिकारी कोळी यांना याअगोदर निवेदन देण्यात आले होते. त्यांनी १५ जूनपर्यंत इमारत दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. जोपर्यंत इमारत बांधकामास सुरुवात होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली होती. यावेळी श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष राजू राऊत, दिनेश मिसाळ, केशव गुंबाडे, सीताराम सापटे यांच्यासह शाळेचे ३० ते ३५ विद्यार्थी व गावातील ८ ते १० ग्रामस्थ ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

२८ जूनपर्यंत छत बसवून वर्गखोली वापरण्यायोग्य करण्यात येणार
विद्यार्थ्यांना बसण्यासाठी गावातील भाऊराव खंबाईत यांचे रिकामे घर भाड्याने घेण्याची लेखी पत्र दिले. सध्या ग्रामपंचायतीमार्फत एका वर्गखोलीची दुरुस्ती सुरू असून दि. २८ जूनपर्यंत छत बसवून वर्गखोली वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...