आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा पेन देत सत्कार:अंदरसूल विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले अध्यापन

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अल्ताफ खान होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. चौथीच्या विद्यार्थिनींनी “थँक्स टीचर, यू आर ग्रेट टीचर” हे गीत सादर केले. यावेळी आज एक दिवसासाठी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य ते शिक्षकांची भूमिका निभावली. दहावीचे ओमराज काळे, स्मिता देशमुख, जानवी सोनवणे, सान्निध्य देशमुख, अनिकेत सोनवणे, निकिता खैरनार यांनी प्राचार्य, उपप्राचार्य व पर्यवेक्षकाचे काम बघितले. लिपिकाची जबाबदारी आकांक्षा रोठे, हर्षाली देवकर यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षक बनून प्रत्येक वर्गात तास घेतले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी अजहर खतीब, अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, मनीष सैंदाणे, गौरव सैंदाणे, अमजद अन्सारी, अजीम पटेल, जयप्रकाश बागूल, माधुरी माळी, चेतना माकुणे, सुनीता वडे,आलिया खान, अर्चना एंडाईत, शर्मिला पवार, वैशाली बागूल आदींसह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव व भक्ती फाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल डुबे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...