आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कार्य:महापुरुष व महिलांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाची विद्यार्थ्यांना दिली माहिती

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाभूळगाव येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त समाज कल्याण पुणे, प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग व सहाआयुक्त समाज कल्याण यांच्या सुचनेनुसार विद्यार्थी ज्ञानवर्धन व माहितीसाठी देशातील सामाजिक सुधारणा तथा शैक्षणिक विचार कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरता आदर्शवत महापुरुष व महिलांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना शरद शेजवळ यांनी करून दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण यावेळी शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एन. पाटील होते. सूत्रसंचालन ए. ए. येळकर यांनी केले. यावेळी एम.के. विंचू, एम.ए. पानपाटील मनोगत व्यक्त केले. आभार एस. सागरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...