आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कादवा:साखर कारखाना निवडणूक; 92.84 टक्के मतदानाची नोंद; 37 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज होणार मतमोजणी

दिंडोरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एकमेव सुरू असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १७ जागांसाठी रविवारी (दि. ३) मतदान घेण्यात आले. यात १२११० पैकी ११२४३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ९२.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. १७ जागांसाठी ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद झाले आहे. सोमवारी (दि. ४) मतमोजणी होणार आहे.

उन्हाची तीव्रता असूनही कादवा कारखान्याच्या सभासदांनी स्वयंस्फूर्तीने मतदानात सहभाग नोंदविला. सकाळपासूनच मतदान केंद्रावर सभासदांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत ५०७३ मतदारांनी हक्क बजवल्याने एकूण ४१.८९% मतदान झाले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ६१ टक्के मतदान झाले. मात्र, पुन्हा दुपारनंतर मतदारांनी सहभाग नोंदवल्याने ९२.८४ टक्के मतदान झाले.

विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी कादवा विकास पॅनल तर ज्येष्ठ नेते बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये लढत झाली. दिंडोरी, कसबे वणी, मातेरेवाडी, वडनेरभैरव व चांदवड या पाच ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी बघावयास मिळत होती. सोमवारी दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...