आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:हेट स्पीचप्रकरणी एमआयएम आमदाराला सुप्रीम कोर्टाची नोटीस

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांना नोटीस बजावली आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल करुन केस का चालवू नये अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवेंसीसह २३ जणांना न्यायालयाने नोटिस बजावली आहे.

दिल्लीच्या लॉयर्स व्हाइस फाेरमने अॅड. अर्चना शर्मा यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार हेट स्पीच दिल्याच्या आरोपावरून २३ जणांना २७ मे रोजी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली हाेती. यात आमदार मुफ्ती इस्माईल यांचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी २०१९ ला मालेगावात झालेल्या एका सभेत मुफ्तींनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याविषयी आमदार मुफ्ती म्हणाले, ‘आपल्या ज्या वक्तव्याचा उल्लेख याचिकेत केला आहे ताे स्थानिक राजकारणावर आधारित हाेता. लवकरच नोटिसाला वकिलांमार्फत आपण उत्तर देऊ.’

बातम्या आणखी आहेत...