आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:मालेगावी नशेच्या औषधांची चाेरटी वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची चाेरटी वाहतूक करणाऱ्या संशयितास विशेष पथकाने रविवारी सकाळी अटक केली. जुन्या आग्राराेडवर केलेल्या कारवाईत कुत्ता गाेली व खाेकल्याच्या बाटल्यांचा ८७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तरुणांमध्ये नशेखाेरीचे प्रमाण वाढत चालले आहे. नशेच्या आहारी गेलेले काही तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे विदारक चित्र आहे. पाेलिसांकडून याविराेधात सातत्याने कारवाया सुरू असून अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या पथकाने गाेपनीय माहितीच्या आधारे या बेकायदा औषध विक्रीचा भांडाफाेड केला. सुरतहून कुत्ता गाेली व खाेकल्याच्या बाटल्यांची विक्रीच्या हेतूने वाहतूक हाेत असल्याची माहिती पथकाला मिळाली हाेती. पथकाने सापळा रचून संशयित मुख्तार अहमद माेहम्मद अरमान याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दाेन प्रवासी बॅगा आढळून आल्या.

बॅगांची झडती घेतली असता अॅलप्राकॅन गाेळ्यांची १४०० पाकिटे व काेनॅक्स सी नावाच्या खाेकल्याच्या ११६ बाटल्या सापडल्या. सदर नशेची औषधे इम्रान माेटवा याच्या सांगण्यावरुन सुरतच्या एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती मुख्तार याने दिली. पथकाने त्याला अटक करून शहर पाेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पाेलिस उपनिरीक्षक विजय गाेपाळ, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार आदींनी सहभाग घेतला.

सुरत कनेक्शन उघड
अॅलप्रायझाेलम, अॅलप्राकॅन गाेळ्या तसेच काेरेक्स व काेनॅक्स या खाेकल्यांच्या बाटल्यांचा नशेसाठी वापर केला हाेताे. ही औषधे डाॅक्टरांच्या चिठ्ठीविना देऊ नये असा नियम आहे. मात्र, सुरतमध्ये या गाेळ्या व औषधे अगदी सहज उपलब्ध हाेत असल्याचे अनेकदा समाेर आले आहे. आझादनगरचे तत्कालीन पाेलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी मागील दाेन कारवायांच्या तपासात सुरतच्या पाच औषधविक्रेत्यांना अटक केली हाेती. बेकायदा औषध विक्रीचे रॅकेट माेडीत काढण्यासाठी सुरतशी निगडीत साखळीचा शाेध घेणे आवश्यक बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...