आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:कोकणगाव येथे आढळला व्यक्तीचा संशयित मृतदेह

पिंपळगाव बसवंत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील कोकणगाव येथील पडीत क्षेत्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.पिंपळगाव परिसरातील कोकणगाव- ओझर महामार्गालगत असलेल्या विजयकुमार सैनी यांच्या पडित क्षेत्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कोकणगावचे पोलिसपाटील तुकाराम पवार यांनी दिली.

मृत व्यक्तीचे वय साधारणतः ४५ ते ५० असून उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात सफेद रंगाचे बारीक ठिपके असलेला फुल शर्ट, निळसर रंगाची पॅन्ट, कमरेस लाल रंगाचा करगोटा असे वर्णन आहे. तपास सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...