आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणची कामे तातडीने पूर्ण:कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करा

येवला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला मतदारसंघातील सुरू असलेली महावितरणची कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रस्तावित कामांचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने कामात दिरंगाई करणाऱ्या आणि ग्राहकांशी बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

भुजबळ फार्म येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील कृषी धोरण २०२० एसीएफअंतर्गत मंजूर असलेल्या महावितरणच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मनमाडचे कार्यकारी अभियंता एस. ए. तडवी, राजाराम डोंगरे, लासलगावचे उपकार्यकारी अभियंता पी. एन. सोनवणे, मालेगावचे सहायक अधीक्षक अभियंता एस. पी. जैन, दिलीप खैरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी कृषी धोरण २०२० एसीएफ अंतर्गत मंजूर असलेली येवला व निफाड तालुक्यातील नगरसूल व कोटमगाव क्षमता वाढ, अंगुलगाव, बल्हेगाव, कुसूर, सोमठाण देश तर निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, मरळगोई येथील अतिरिक्त ५ एमव्हीए रोहित्र, सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजने अंतर्गत चिचोंडी औद्योगिक वसाहत, पिंपळगाव जलाल येथे ५ एमव्हीएचे नवीन विद्युत उपकेंद्र, भरवस फाटा येथे नवीन विद्युत उपकेंद्र, येवला येथे ५ एमव्हीए ऐवजी १० एमव्हीएचे रोहित्र बसविणे, येवला ग्रामीण ३५ नवीन रोहीत्र, येवला शहर २३ नवीन रोहीत्र, खडकमाळेगाव, विंचूर उपकेंद्रात नवीन ११ के.व्ही. लिंक लाइन, देवगाव व लासलगाव ग्रामीण-५१ नवीन रोहित्र, सारोळा विंचूर वाकद नवीन रोहित्र बसविणे या कामांसोबत प्रस्तावित असलेली जउळके येथे ५ एमव्हीए चे नवीन विद्युत उपकेंद्र, मानोरी येथे नवीन फिडर या कामांचा आढावा घेतला. लासलगाव-विंचूरसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत राहण्याठी २४ तास वीज सुरू ठेवण्यासाठी येथे विजेचे संयंत्र बसवण्याचे काम आज पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अभियंता पडळकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...