आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवरे येथे म्हाळुंगी नदीवर बांधण्यात येणाऱ्या तवली बंधाऱ्याच्या कामास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. ५२० सहस्त्र घनमीटर क्षमता असलेल्या या बंधाऱ्याच्या कामास १० कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.या बंधाऱ्यामुळे प्रत्यक्षरित्या १४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असले तरी भूगर्भातील पाणीपातळी वाढून पिंपळे, पाडळी व टेंभूरवाडी या गावांच्या सिंचनातही वाढ होऊ शकणार आहे.
त्यातून या भागातील पीक पद्धतीतही बदल होणार आहे. देवनदीवरील पाच व हिवरे येथील एक अशा सहा मोठ्या बंधाऱ्यांना मंजुरी मिळण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी २०१२-१३ या साली प्रयत्न सुरू केले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून या बंधाऱ्यांना मंजुरी देण्यासाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. जलसंधारण विभागाने या योजनांना तांत्रिक मंजुरी दिली होती. वडांगळी व कीर्तांगळी येथील बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. मात्र, देवनदीवरील उर्वरित बंधारे व हिवरे येथील या तवलीच्या बंधाऱ्यास पुढे सरकार बदलल्याने मंजुरी मिळू शकली नाही.
राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर आमदार कोकाटे यांनी चोंढी, निमगाव देवपूर, देवपूर येथील बंधाऱ्यांची कामे सुरू केली. वाढत्या महागाईमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हिवरे येथील तवलीच्या बंधाऱ्याचे नव्याने अंदाजपत्रक बनवून ते सुधारित प्रस्तावासह जलसंधारण महामंडळाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली होते. जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु. पा. कुशिरे यांनी नुकतीच प्रशासकीय मंजूरी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.