आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:महापालिकेकडून कर; घरपट्टी थकबाकीदारांना सवलत

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका कार्यक्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टी व संकीर्ण कर थकबाकीदारांना व्याजात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांनी दि. १२ नोव्हेंबर रोजी आयोजित लोकअदालतीत थकीत प्रकरणांवर तडजोड करून उर्वरित रक्कम तात्काळ भरावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.

दि.१२ राेजी राष्ट्रीय लोक अदालत आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांनी लोक अदालतीमध्ये येऊन किंवा त्यापूर्वी प्रभाग समिती कार्यालयामध्ये थकीत घरपट्टी व पाणीपट्टीचा एक रक्कमी भरणा केल्यास व्याजामध्ये १०० % सवलत देण्यात येणार आहे. संकीर्णकर वसुली विभागाकडे थकबाकीदाराने संकीर्ण कराची थकबाकी रक्कम मुख्यालय येथील संकीर्णकर विभागामध्ये जाऊन भरायची आहे. मुदतीत थकीत कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कार्यवाही व नळ जोडणी खंडित करण्यात येईल व येणारा खर्च देखील संबंधित मिळकत धारकांकडून वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

कर भरण्यासाठी सुविधा
मालमत्ता धारकांना भरणा रोखीने प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर करतांना त्वरित संगणकीय पावती प्राप्त करून घ्यावी. धनादेशाद्वारे तसेच फोन पे द्वारे भरणा करण्यासाठी प्रभाग कार्यालयात क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फोन पे द्वारे भरणा केल्यानंतर संबंधित लिपिक यांचेकडून त्वरित संगणकीय भरणा पावती घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...