आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राथमिक शिक्षण पद्धतीतून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या पर्यावरण विषयक जाणिवा जागृत व समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने युनिसेफ व पर्यावरण शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षक पर्यावरण संवर्धनासाठी काम करून निसर्ग सौंदर्य वाढविण्यासाठी कर्तव्य बजावणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, पर्यावरणासंदर्भात उद्भवणारी धोके व आव्हाने असे जागतिक प्रश्न सगळ्यांसमोर उभी आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर कुणी एकाने ते अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने युनिसेफ व पर्यावरण शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावच्या शिक्षकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
या बाबींवर लक्ष केंद्रित
प्रशिक्षणात पर्यावरण आणि वातावरण संकल्पना, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल व परीणाम, जैवविविधता, ऊर्जा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण वातावरण आणि अध्ययन निष्पत्ती, विविध कृती उपक्रम व प्रात्यक्षिक यांची माहिती देण्यात येईल.
शाळेत राबवायचे कृती कार्यक्रम
पाणी वापर मोजूया पाण्याच्या गळतीचे ऑडिट, पावसाचे पाणी मोजणेकचऱ्याच्या प्रकाराची जनजागृती, घरातील कचऱ्याचे ऑडिट कंपोस्ट खड्डा तयार करणे, झाडांचे ऋतूनुसार बीज संवर्धन, शाळेतील रोपवाटिका आणि वृक्षारोपण विज बिल बचत मार्गदर्शन, घराचे ऊर्जा लेखापरीक्षण, हवामान संकेत डेटा संकलन ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर करणे.
पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी. या हेतूने पर्यावरण व वातावरण बदल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कल्पना आणि कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. -नीलेश भामरे, विभागीय तज्ञ, मार्गदर्शक पर्यावरण व हवामान बदल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.