आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमद्वारे आयोजित ‘एसएनजेबी आयडिएशन चॅलेंज २०२२’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पाडला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोदाम इनोव्हेशन्सच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालिका कल्याणी शिंदे उपस्थित होत्या. पारितोषिक वितरण समारंभ एसएनजेबी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे सहसचिव झुंबरलाल भंडारी, तांत्रिक सल्लागार डॉ. आर. जी. ताथेड, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, एसएनजेबी आयडिएशन चॅलेंजचा कार्यक्रम संचालक प्रा. पी. एम. बोरा आदींसह नेमिनाथ संस्थेतील विविध विभागांचे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी व उत्पादन, प्रक्रिया किंवा सेवा सुधारण्यासाठी नवीन कल्पना निर्माण, विकसित करणे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एचएचजेबी तंत्रनिकेतनातील संघांनी पारितोषिके पटकावली. त्यात प्रथम क्रमांक - जबेझ त्रिभुवन व संघ, द्वितीय क्रमांक - गायत्री पाटील व संघ, तृतीय क्रमांक - क्षत्रिय स्वामी व संघ, चतुर्थ क्रमांक - दुर्गेश खैरनार व संघ, पाचवा क्रमांक - रोहित महाजन व संघ यांनी पटकावला. हा उपक्रम प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, उपप्राचार्य एच. एस. गौडा, संगणक विभागप्रमुख ए. एस. चोरडिया, उद्योजकता सेल समन्वयक जी. जे. पगार, ए. ए. पवार व डी. बी. झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विजेत्या संघांचे नेमिनाथ संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.