आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात तापमान तफावत:प्रत्येक 1 किमीवर तापमानात बदल; बडा कब्रस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, तापमान तब्बल तीन अंश कमी

मालेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी उन्हाळ्यात उत्तर महाराष्ट्राचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या मालेगाव शहरात प्रत्येक एक किमी अंतरावर तापमानात बदल होत असल्याच्या नोंदी दैनिक ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्व्हेतून समोर आल्या आहेत. विरळ लोकसंख्या असणाऱ्या वसाहतींच्या तुलनेत दाटीवाटीच्या वस्त्यांच्या परिसरात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हा वृक्षसंपदेचा स्पष्ट परिणाम असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. अवघ्या ४६ मिनिटांत शहरातील चार ठिकाणांच्या तापमान नोंदीतून ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

शनिवारी दुपारी १२.५० ते १.३६ वाजता या कालावधीत शहरातील चार प्रमुख चार ठिकाणांच्या नोंदी ‘दिव्य मराठी’कडून घेण्यात आल्या. तापमानाची विश्वासार्हता राहण्यासाठी काकाणी विद्यालयातील प्रयोगशाळेतील तापमापीचा वापर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...