आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंजरा लावण्याची मागणी:बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार; भंडाणे शिवारातील गाेट फार्ममधील प्रकार

जायखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांदुळवाडी (ता. बागलाण) येथील भंडाणे शिवारातील बंदिस्त गोट फार्म मधील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून १० शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे शिवारारातील शेतकरी व पशुपालक धास्तावले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तांदुळवाडी येथील शेतकरी काशीनाथ जगन्नाथ भामरे यांनी आपल्या भडाणे शिवारातील शेतात बंदिस्त गोट फार्म तयार करून सोजत जातीच्या महागड्या शेळ्यांचे पालन सुरू केले आहे. शेडच्या काेपऱ्यातील बारीक जागेतून बिबट्याने रात्रीच्या सुमारास प्रवेश करत शेळ्यांवर हल्ला केल्याने १० शेळ्या ठार झाल्या.

यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी दिनचर्येप्रमाणे शेळ्यांना चारा-पाणी करण्यासाठी भामरे गेले असता, गोठ्यात शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून या घटनेबद्दल वन विभागास कळविले वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

या भागामध्ये बागायती शेतीचे प्रमाण जास्त असून परिसरात मका व बाजरी मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला येथे निवारा मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने लवकरात लवकर शासनाकडून शेतकऱ्याला भरपाई द्यावी व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...