आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता कायम:दिंडोरीत ठाकरे गटाचे वर्चस्व

दिंडोरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेच्या ठाकरे गटाला तीन, राष्ट्रवादीला दोन तर भाजपला एक जागा मिळाली. निळवंडी येथे सत्ता परिवर्तन झाले असून उमराळे बु., वनारवाडी, रामशेज, कोकणगाव खुर्द, जालखेड येथे सत्ताधाऱ्यांनी सत्ता कायम राखली आहे.

निळवंडी येथे ‘परिवर्तन’ पॅनलचे नेतृत्व पोपट भगवंत पाटील, अंबादास द. पाटील, कचरु पवार, उत्तम पाटील, गुलाब पाटील यांनी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करीत ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवून आणले. उमराळे बु. येथे जी. डी. केदार, रामदास धात्रक यांच्या जनसेवा पॅनलने सत्ता कायम राखली.

रामशेज येथे भाजपचे नेते शामराव बोडके यांच्या नेतृत्वाखाली रामशेजची सत्ता राखत वर्चस्व कायम ठेवले. कोकणगाव खुर्द येथे संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखून सत्ता कायम ठेवली. जालखेड येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नाना मोरे व जीवन मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत अविरोध पार पडली होती.

परंतु, एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी सत्ता मात्र त्यांनी कायम राखली आहे. वनारवाडी येथे सहा जागा अविरोध झाल्या होत्या. सरपंचपद व एक सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दत्तू भेरे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह सदस्यपदावर बाजी मारत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

बातम्या आणखी आहेत...