आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठाणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे समर्थक नामदेव शिंदे यांची सरपंचपदी वर्णी लागली. माजी सरपंच सीमा शिंदे यांचे पती अशोक शिंदे पराभूत झाले.सदस्यपदाच्या जागांवर नामदेव शिंदे यांच्या श्री विकास पॅनलला ८ तर ए. टी. शिंदेंच्या जनशक्ती पॅनलला ३ जागा मिळाल्या. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.
प्रभाग क्रमांक एकमधून मदन गंगाधर शिंदे (४०६), अलकाबाई संजय शिंदे (४३६), कामिनी शंकर जगताप (४०४) यांनी विजयश्री संपादन केली. शांताराम नामदेव शिंदे (३९४), शोभा सुभाष शिंदे (३५८), मनीषा गणेश आव्हाड (३७५) यांना पराभवाला सामोर जावे लागले. प्रभाग क्रमांक २ मधून श्री विकास पॅनलचे रूपाली रामदास भोर (३२१), जनशक्ती पॅनलचे केशव बाळासाहेब काकड (३४७), मनीषा अनिल सोंगाळ (३११) हे विजयी झाले. ज्ञानेश्वर दिनकर शिरसाठ (२४८), संगीता सुभाष कातोरे (२४७), मुनाबाई मदन मेंगाळ (२९८) यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रभाग ३ मधून श्री विकासचे प्रमिला दत्तू आव्हाड (५४४), द्राैपदी अमित पानसरे (४९७) विजयी झाले. तर गेल्या वेळी जनतेमधून निवडून गेलेल्या महिला सरपंच सीमा अशोक शिंदे (२६४) यांचा पराभवाला झाला. प्रभाग ४ मधून जनशक्तीचे अनिल बाळू सोंगाळ (३११), अपक्ष उमेदवार मोहन मुरलीधर आव्हाड (३३८) हे विजयी झाले. श्री विकासचे मच्छिंद्र देवराम जाधव (२३७), बबन त्र्यंबक काकड (२२४) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग ५ मधून श्री विकासचे नामदेव कोंडाजी फोडसे (३९७), विलास रंगनाथ मोरे (४१६) विजयी झाले. जनशक्तीच्या सोपान आंतू गुंड (२३०), कचरू विठ्ठल गाडेकर (२२१) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आंनदोत्सव साजरा केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.