आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुलतानीबराेबरच अस्मानी संकट‎:अवकाळीचा तडाखा; गहू आडवा, कांदा भिजला‎

लासलगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : नीलेश देसाई, लासलगाव.‎ - Divya Marathi
छाया : नीलेश देसाई, लासलगाव.‎

बळीराजाला एकीकडे कांदा व द्राक्ष कवडीमोल‎ भावाने विक्री करावे लागत असताना दुसरीकडे‎ अस्मानी संकटानेही त्यांना घेरले आहे.‎ सोमवारी पहाटे चारपासून अवकाळी पाऊस‎ सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे कांदा, मका, हरभरा,‎ गहू व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान‎ खात्याने दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली‎ होती. लासलगाव परिसरात सोमवारी पहाटे‎ चारपासून पावसास विजांच्या कडकडाटासह‎ सुरुवात झाली.

अनेक ठिकाणी शेतात काढून‎ ठेवलेला कांदा या पावसात भिजला आहे. द्राक्ष‎ हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना १८ ते २० रुपये‎ प्रति किलोने द्राक्ष विक्री करण्याची वेळ आलेली‎ असताना अवकाळीच्या तडाख्यात द्राक्ष पीक‎ सापडले आहे. शेतातील गहू, हरभरा पीक‎ आडवे झाले आहे. लासलगाव बाजार समितीत‎ व्यापाऱ्यांचा उघड्यावर असलेला कांदा तसेच‎ मका भिजल्याने नुकसान झाले आहे.‎ बाजारपेठेत शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे‎ सुलतानी संकट व पावसाचे वातावरण नसताना‎ अचानक पाऊस होऊन मोठ्या नुकसानीला‎ सामोरे जावे लागत असल्याने अस्मानी संकट‎ अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील बळीराजा‎ सापडला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...