आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळून आला:बेपत्ता तरुणाचा मृतदेह देवपूर शिवारात आढळला

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवपूर येथे देवनदीच्या पुलाचा भराव वाहून गेल्याने त्यात डंपर अडकला होता. या देवनदीच्या पुरात डंपरमध्ये बसलेला युवक वाहून गेला होता. युवकाचा मृतदेह रविवारी (दि.४) सकाळी देवपूर शिवारात देवदीपात्रात झाडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. आकाश शिवाजी काळे (२८) रा. धारणगाव असे मृत तरुणाचे‌ नाव आहे.

गुरुवारी सिन्नर शहरासह तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने देवनदीला मोठा पूर आला होता. या पुरात देवपूरकडून सिन्नरकडे मनमोडा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर राणेखान वाड्याजवळ असलेल्या देवनदीच्या पुलात एक डंपर अडकला होता. पुलाचा भराव वाहून गेल्याने चालकाला अंदाज न आल्याने डंपर देवनदीच्या पात्रात अर्धवट बुडालेला अवस्थेत अडकला होता. यात चालक सुदैवाने वाचला होता तर त्याच्या शेजारी बसलेला आकाश शिवाजी काळे (२८) रा. धारणगाव, ता. सिन्नर हा युवक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी वावी पोलिस ठाण्यात आकाश बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. रविवारी सकाळी आकाशचा मृतदेह देवनदीच्या पात्रात असलेल्या एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...