आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारत मोडकळीस:शिंदे (दिगर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत मोडकळीस; नवीन इमारत बांधून देण्यात यावी

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील शिंदे (दिगर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत मोडकळीस आली आहे. शिंदे (दिगर) परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करतात. आपल्या जनावरांच्या आरोग्याचा कोणताही प्रश्न उद‌्भवल्यास परिसरातील सर्व पशुपालक शिंदे (दिगर) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात जातात, मात्र सद्यस्थितीत पाच ते सहा वर्षांपासून ही इमारत मोडकळीस आली असून मागील पावसाळ्यात इमारतीचे लोखंडी पत्रे उडाले आहेत.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळते. त्यामुळे दवाखान्याच्या शेजारील एका रूममध्ये दवाखान्याचे कामकाज बघितले जात आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.

नवीन इमारत बांधून देण्यात यावी
पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जवळपास पाच ते सहा वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने दवाखान्याचे कामकाज शेजारी असलेल्या एका रूममध्ये केले जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी योग्य ते लक्ष घालून त्या जागेवर नवीन इमारत बांधून देण्यात यावी किंवा इमारतीची दुरुस्ती करून द्यावी.
- काशीनाथ पवार, पोलिसपाटील, शिंदे दिगर

बातम्या आणखी आहेत...