आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्यांना सूचना:पिंपळखुटे तिसरेला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुवस्थेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला-नांदगाव महामार्गावरून प्रसिद्ध म्हसोबा देवस्थान असलेले पिंपळखुटे तिसरे पाच किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, या पाच किलाेमिटरच्या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत त्यातच ताे अरुंद असल्याने येथील ग्रामस्थांसह येणाऱ्या भाविकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती मागणी करण्यात येत येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात हाेते. परंतु, आता एका पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या दुरवस्थेची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या कामाबाबत याेग्य त्या सूचना केल्या आहेत.

पिंपळखुटे तिसरे येथे नवसाला पावणारे प्रसिद्ध म्हसोबा मंदिर असून येथे मोठी यात्रा भरते. मुंबई, नाशिकहून भाविक यात्रेला येतात. मात्र, खराब रस्त्यांमुळे गावात जाणे मुश्कील होत आहे. गेली अनेक वर्षे हजार वेळा मागणी करूनही प्रचंड दुरवस्था झालेल्या राज्यमार्ग क्रमांक २५ ते पिंपळखुटे तिसरे या अवघ्या चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडत नव्हता. शिंदे सरकार सत्तेत आल्यावर या भागातल्या ग्रामस्थांनी बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभा प्रमुख अतुल पालवे यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी करणारे पत्र दिले हाेते. गावासाठी महत्त्वाचा रस्ता असल्याने पालवे यांनी रस्त्याच्या नूतनीकरण्याची, दुरुस्तीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन सूचना केल्याने ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंत्याना तातडीची कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. आता या रस्त्याच्या नूतनीकरणाची ऑर्डरही निघाली. आवश्यक तो निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया करून रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल. रस्ता प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी पालवे यांचे आभार मानले आहे. ग्रामस्थांसोबत त्यांनी या रस्त्याची पाहणी केली असून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पालवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...