आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"कोणत्याही काव्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट काळाचे बंधन नसते. स्वातंत्र्य देवीची विनवणी या काव्याची निर्मिती करताना कुसुमाग्रजांनी प्रसिद्धीस देऊनही ती तीन वेळा परत मागून नव्याने दुरुस्त करून दिली होती. काव्याची निर्मिती ही मनाच्या गाभ्यातून होते. असे उद्गार लेखक व जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी येथे काढले येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात डॉ. उज्वला देवरे यांच्या ''काव्य एकषष्ठी'' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर विष्णू थोरे, विनोद पाटील ,रवींद्र मगर, शिवाजी देवरे, प्रा उज्वला देवरे हे होते. कांबळे म्हणाले, समाजाने साहित्यिकांवर मोठे प्रेम केले पाहिजे. त्यांच्यामुळे सुसंस्कृत समाज निर्माण व्हायला मदत होते. काव्य निर्मिती ही वयातीत असते त्यामुळेच २०० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या कविता आजही ताज्या वाटतात. बालकवींच्या कविता आपण आजही गुणगुणतो. कवी हे काव्य वेडे असतात. नवनिर्मितीसाठी ते वेडे होतात. काहीतरी करण्याशिवाय करण्यासाठी असे वेडे व्हावे लागते. यावेळी अॅड शिशिर हिरे, विनोद पाटील, रवींद्र मगर यांची भाषणे झाली. डॉ. विनोद गोरवडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनीत देवरे व डॉ. विशाल देवरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन अभय दीक्षित यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.